पर्यटन मंत्रालयातर्फे गोव्यात 19 ते 22 जून दरम्यान चौथी जी-20 पर्यटन कार्यगटाची बैठक आणि पर्यटन मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. त्यात क्रूझ टूरिझम आणि ग्लोबल टूरिझम या संमेलनातील प्रमुख साइड इव्हेंट असतील. पर्यटन कार्यगट पाच परस्पर-संबंधित प्राधान्य क्षेत्रांवर काम करत आहे. ज्यात हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य, पर्यटन एमएसएमई आणि गंतव्यस्थान व्यवस्थापन यांचा समावेश आहे, अशी माहिती पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.