पर्यटन हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून सरकारच्या करविषयक धोरणामुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी लागू केलेला वेगवेगळा मिळून १९.५ टक्के कर रद्द करण्याची मागणी कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केली. खाण अवलंबितांना ज्या प्रमाणे सरकारने मदत केली आहे, त्याच धर्तीवर हॉटेल व्यावसायिकांनाही मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.