पदव्युत्तर करिअरच्या संधी

0
164
  •  नागेश एस. सरदेसाई (वास्को)

मित्रांनो, आता निवड करण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. परीक्षांसाठी जोरदार तयारी करा. जितके जमतील तितके मॉक पेपर्स सोडवून पहा. वेळेचे योग्य नियोजन करा आणि या परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. एकविसाव्या शतकात सरकारसाठी काम करून, तुमच्या जवळचे उत्तम देऊन राज्याच्या कल्याणाचे स्वप्न पूर्ण करा.

लवकरच विविध पूर्वपदवी कोर्सेसचे निकाल हाती येतील आणि ही वेळ अशी आहे की सगळे तरुण एम्प्लॉयमेंट एक्चेंजच्या समोर, स्वतःला सरकारी यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी, रांगेत उभे राहतील आणि विविध नोकर्‍यांचे कॉल्स येण्याच्या अपेक्षेत असतील. आजमितीला जेव्हा अनेक कारणांनी या नोकर्‍या थोड्याच असून मिळणं अवघड झालेलं असताना, त्याच्या पुढे जाऊनही तरुणांनी वेगळा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या विविध विभागात आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची, त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आणि ती म्हणजे ‘स्पर्धात्मक परीक्षा’!!
केंद्र सरकार दर महिन्याला रिकाम्या जागांसाठी जाहिरात देत असते, ज्यामध्ये निरनिराळे व्यावसायिक, कुशल, अर्ध-कुशल, कुशल नसलेले आणि मल्टी टास्किंग सर्व्हिसेससाठी जागा असतात. दर आठवड्याला, दर शनिवारी प्रसिद्ध होणार्‍या ‘रोजगार समाचार/एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होते. हे साप्ताहिक हिंदी किंवा इंग्रजी भाषेत प्रकाशित होतं आणि ते इ-एम्प्लॉयमेंट न्यूज नेटवरसुद्धा दिसतं. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे हे साप्ताहिक म्हणजे देशभरातल्या सरकारच्या जवळजवळ १०० निरनिराळ्या विभागात नोकर्‍या मिळवून देणारी किल्लीच आहे. या नोकर्‍यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही काम करण्याची उत्तम संधी मिळते. यामुळे त्या-त्या भागातील विविध गोष्टींचा जवळून अभ्यास करण्याची दुर्मीळ संधीही त्यांना मिळते. उदा. भारतीय रेल्वे, त्यांच्या देशभरातील एकूण १६ विभागातून प्रतिभावान तरुणांसाठी बर्‍याच संधी उपलब्ध होतात. त्याशिवाय सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (सीपीडब्लूडी), सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिसेस (सीजीएचएस) हे काही इतर विभाग आहेत, जे कुशल नसलेल्यांच्या नोकर्‍यांशिवाय व्यावसायिक क्षेत्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकर्‍या देतात जसे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्‌स, आय.टी. व्यावसायिक. यामध्ये अर्जदारांची संख्या प्रचंड मोठी असते त्यामुळे मुलाखतीसाठी उमेदवार निवडण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाते. ही स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे एक व्यक्तिमत्त्व चाचणी असते, ज्यामुळे विशिष्ट कामासाठी उमेदवाराचा कल किंवा वृत्ती ओळखून तो उमेदवार त्या विशिष्ट कामासाठी योग्य आहे की नाही ते ओळखले जाते किंवा त्या उमेदवाराजवळ त्या विशिष्ट कामासाठी काही कौशल्ये आहेत का ते ओळखता येते. या अशा लिपिक प्रकारच्या नोकर्‍यांसाठी उमेदवार तयारी कशी करतो?…
आपल्यापैकी सगळ्यांनीच इंग्रजी, अंकगणित, कारणमिमांसा(रिझनिंग), तर्क (लॉजिक) इत्यादी विषयांचा अभ्यास शाळेच्या दिवसात केलेलाच आहे. या प्रकारच्या नोकर्‍यांकरिता होणार्‍या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये – इंग्रजी व्याकरण आणि रचना, प्रिसाइज, सांगितले तसे करा अशा प्रकारचे प्रश्‍न असतात. अंकगणितात रेट अँड प्रपोर्शन, सिंपल अँड कम्पाउंड इंटरेस्ट, टाईम, साउंड, ऍक्सिलरेशन, इत्यादी आहेत. रिझनिंग, लॉजिकसाठीसुद्धा विविध पुस्तकांचा अभ्यास करून त्यांची उजळणी करता येते. उदा. ‘प्रतियोगिता दर्शन’, ‘कॉम्पिटेटिव्ह सक्सेस रिव्ह्यू, कॉम्पिटिशन ३६०, इ.चा अभ्यास केला जातो व स्वतःची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट सोडवली जाते. वेळेचे नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण प्रश्‍न सोपे असतात पण त्यासाठी ठरावीक वेळ नियोजित केलेली असते.

निरनिराळ्या विषयातील उमेदवारांमधील कौशल्ये ओळखण्यासाठी काही परीक्षांमध्ये मल्टिपल चॉईस क्वेशन्स विचारले जातात. बँकिंकच्या क्षेत्रातसुद्धा, अनेक परीक्षा असतात ज्यांची जाहिरात राष्ट्रीय किंवा स्थानिक वृत्तपत्रात किंवा रोजगार समाचारमध्ये येते. लिपिक ते परीविक्षा अधिकार्‍यांच्या जागांपर्यंत सर्व नोकर्‍या या तरुण आणि उद्यमशील व्यक्तींसाठी उपलब्ध असतात. काही क्षेत्रांमध्ये गोव्यातील तरुणांसाठी ठरावीक कोटा असतो. ऑनलाइन अर्ज मागवले जातात. बँकिंगच्या क्षेत्रात प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळ्या परीक्षा असतात. लिपिक वर्गाकरिता – अंकगणित, इंग्रजी, तर्कशास्त्रीय कारणमिमांसा (लॉजिकल रिझनिंग) – या प्रकारचे प्रश्‍न मल्टिपल चॉइस क्वश्‍चन्स रचनेमध्ये विचारले जातात.

दुसरीकडे, परिविक्षा अधिकार्‍यांसाठी पब्लिक सेक्टर बँक्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडण्यासाठी, खूप कठीण विषयांवर प्रश्‍न विचारले जातात- जसे करंट अफेअर्स, अकाउन्टन्सी, रीझनिंग ऑफ ए हायर मॅग्नीट्यूड. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांच्या विशिष्ट विभागांसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण जागांसाठी सायंटिफिक ऑफिसर्स, ऍग्रीकल्चरल ऑफिसर्ससुद्धा घेतले जातात. आजच्या वर्तमान युगात असे दिसून येते की खूप वेगवेगळ्या व्यवसायातील मोठ्या संख्येतील तरुण जसे चार्टर्ड अकाउंटन्ट्‌स, वकील, आणि तंत्रज्ञसुद्धा या स्पर्धात्मक परीक्षा देताना दिसतात. कारण आजचे युग हे इंटर-डिसिप्लिनरी युग असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण घेतलेले तरुण एकाच छताखाली काम करतात. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (युपीएससी)च्या दर वर्षी घेतल्या जाणार्‍या कम्बाइंड इंजिनिअरिंग सर्व्हिस (सीईएस) परीक्षेद्वारे इंजिनिअर्सची निवड केली जाते. मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल या शाखांना मागणी आहे.. युपीएससीच्या परीक्षेत जनरल अवेअरनेस, इंग्रजीची एक परीक्षा आणि दुसरी त्या त्या शाखेची विशेष परीक्षा, अशा दोन भागात परीक्षा देता येतात. पहिल्या भागात एक दिवसीय परीक्षा असते. त्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना दुसरी परीक्षा- इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम, द्यावी लागते, जी चार महिन्यानंतर घेण्यात येते, ज्याच्यानंतर उमेदवाराला व्यक्तिमत्त्व चाचणी देण्यासाठी युपीएससी-नवी दिल्लीला बोलावले जाते, जेथे अंतिम उमेदवारांची निवड केली जाते व त्यांना भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमध्ये नोकरीसाठी पाठवले जाते, ज्यामध्ये निवडलेले उमेदवार सर्वोत्कृष्ट असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रगतीची खात्री देता येते.

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (युपीएससी)चा एक संविधानिक वैचारिक विभागातर्फे पदवी पातळीवर इतर भरपूर परीक्षा घेतल्या जातात, ज्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला जाहीर करण्यात येतात. त्यासाठी तरुणांनी खालील वेबसाईटवर माहिती पहावी- ुुुर्.ीिील.र्सेीं.ळप ज्यामुळे त्यांना परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दलची स्पष्ट माहिती मिळेल, ज्यामुळे ते त्याची तयारी योग्य रीतीने करू शकतील आणि वेळेचे योग्य नियोजन करून त्यांच्या पुढील जीवनाचा उत्तम निकाल ते देतील. युपीएससीच्या वेळापत्रकावर सूक्ष्म नजर टाकली असता असे दिसून येते की जिऑलॉजिस्ट आणि जिओ-सायंटिस्टसाठी दर वर्षी एक परीक्षा घेण्यात येते- जिच्याद्वारे ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (आयसीआर), विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सतिश धवन स्पेस सेंटर यांसारख्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्ससाठी उमेदवारांची निवड करतात. जिऑलॉजी आणि इंजिनिअरिंगची पदवी असलेले सगळे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.

सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्स (एसीएस) ही परीक्षा पोलीस विभागातील अधिकार्‍यांच्या निवडीसाठी घेतली जाते- जसे सेंट्रल इंडस्ट्रीयल सर्व्हिस फोर्स (सीआयसीएफ), बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बीएस्‌एफ्), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआर्‌पीएफ्) इत्यादी.
आपल्यापैकी ज्यांच्याजवळ अर्थशास्त्राची (इकॉनॉमिक्स), इकॉनॉमेट्रिक्स, स्टॅटिस्टिक्सची पदवी असेल तर ते आयईएस/आयएसएस – इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस/इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस मध्ये अधिकार्‍याची जागा मिळवू शकतात. हे अधिकारी सुरुवातीला अत्यंत सावधपणे राज्याचे बजेट बनवतात.

बॉटनी/झुऑलॉजी/मायक्रोबायॉलॉजीमध्ये पदवी असणारे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आय्‌एफ्‌एस्)साठी अर्ज करू शकतात, जी दोन विभागात घेतली जाते. प्राथमिक (मसीक्यू पद्धतीने) आणि नंतर मेन्स परीक्षा (सविस्तर) व त्यात यशस्वी झाल्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते. यशस्वी उमेदवारांची निवड असिस्टंट कंझर्व्हेटरर्स ऑफ फॉरेस्ट म्हणून राज्यातील विविध फॉरेस्ट विभागात केली जाते. गोव्यात एकूण १२ अधिकारी आहेत ज्यांची नियुक्ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, भारत सरकारतर्फे केली जाते.

युपीएससीची ‘ब्लू रिबन्ड परीक्षा’ ही सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा असून ती वर्षातून एकदा पण दोन भागात- प्राथमिक आणि प्रमुख अशी घेतली जाते. कोणत्याही विषयातील पदवीधर ह्या परीक्षा देऊ शकतात. प्राथमिक परीक्षा जूनमध्ये घेतली जाते. आय्‌एएस्- इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, आय्‌पीएस्- इंडियन पोलीस सर्व्हिस, आय्‌एफ्‌एस्- इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि अशा अनेक परीक्षा आहेत. कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम – वर्षातून दोन वेळा घेतली जाते, जिच्याद्वारे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि ऑफिस ट्रेनिंग ऍकॅडमी (शॉर्ट सर्व्हिस कमिशन)मध्ये अधिकार्‍यांची (पुरुष आणि महिला) निवड केली जाते. पदवी मिळविणे हे अगदी मुलभूत शिक्षण आहे आणि प्रवेश परीक्षांमध्ये इंग्रजी, सर्वसामान्य जागरूकता आणि अंकगणित हे विषय असतात. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डासमोर मुलाखतीला सामोरे जावे लागते आणि त्यांची नंतर खालील ऍकॅडमींमध्ये नियुक्ती केली जाते जसे इंडियन मिलिटरी ऍकॅडमी, देहरादून (आयएमए); नेव्ही ऍकॅडमी (एनए- एझिमला केरळ); एअर फोर्स ऍकॅडमी-बेगमपेट आणि एटीए – गया किंवा चेन्नई.
गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन (जीपीएससी)ने गोवा सरकारच्या विविध विभागात विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यासाठी सीबीआरटी- कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट चालू केली आहे. उदाहरणासाठी – कमर्शियल टॅक्स ऑफिसर्स, ऍग्रीकल्चरल ऑफिसर्स, असिस्टंट प्रोफेसर्स इन ऍफिलिएटेड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मेडिसीन, जनरल प्रवाह, मामलतदार आणि ज्युनिअर स्केल ऑफिसर्स इन गोवा ऍडमिनिस्ट्रेशन. निवडलेल्या उमेदवारांना नंतर पणजीच्या जीपीएससी ऑफीसमध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाते किंवा ज्युनिअर स्केलच्या अधिकार्‍यांच्या बाबतीत, त्यांना मेन एक्झाम द्यावी लागते आणि नंतर मुलाखत द्यावी लागते.

मित्रांनो, आता निवड करण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. परीक्षांसाठी जोरदार तयारी करा. जितके जमतील तितके मॉक पेपर्स सोडवून पहा. वेळेचे योग्य नियोजन करा आणि या परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. एकविसाव्या शतकात सरकारसाठी काम करून, तुमच्या जवळचे उत्तम देऊन राज्याच्या कल्याणाचे स्वप्न पूर्ण करा.