म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पणजी पोलीस हल्ला प्रकरणी सुनावणी येत्या ७ मार्च २०२२ पर्यत तहकूब केली आहे. वर्ष २००८ मध्ये पणजी पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात प्रमुख मुख्य संशयित आहेत. सीबीआयने या प्रकरणी मोन्सेरात दाम्पत्य व इतर ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील काही संशयित आरोप न्यायालयात हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.