पणजी परिसरात पाच दिवसांत १५९ बाधित

0
317

पणजी परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला असून काल बुधवारी नवे ४२ रूग्ण आढळून आले असून मागील पाच दिवसात १५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पणजी परिसरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१९ एवढी झाली आहे. पणजी उच्च शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत दरदिवशी नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.
पणजी परिसरात दि. १९ रोजी ३५, २० रोजी ३५, २१ रोजी १२, २२ रोजी ३५ आणि दि. २३ रोजी ४२ रुग्ण आढळून आले आहेत.
कांपाल, रायबंदर, मिरामार, टोक, आल्तिनो, सांतइनेज, मळा, करंजाळे, रायंबदर, पणजी चर्च परिसर, बॉक द व्हॉक, भाटले, मळा, पणजी शहर आदी भागात रुग्ण आढळून येत आहेत. पणजीत चित्रीकरणासाठी आलेले मुंबईतील सात जण बाधित झालेले आहेत. कोरोनाबाधित होणारे रुग्ण होम आयसोलेशनाचा पर्याय जास्त प्रमाणात स्वीकारत आहेत. होम आयसोलेशनमुळे त्या परिसरातील लोकांना सतर्क राहावे लागत आहे.