पणजीतील कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गान

0
119

>> जिल्हाधिकार्‍यांची मान्यता

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पणजीतील कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गावरून काढण्यास एका बैठकीत काल मान्यता देण्यात आली.
मागील दोन वर्षे मिरामार ते दोनापावल या मार्गावर शहरातील कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येत होती. यावर्षी कार्निव्हल मिरवणूक पाटो – पणजी ते कला अकादमी या जुन्या मार्गावरून काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. येथील पोलिसांनी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून जुन्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. त्यामुळे कार्निव्हल मिरवणुकीच्या मार्गावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल गुरूवारी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पोलीस अधिकार्‍यांनी वाहतूक कोंडीमुळे जुन्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला जात असल्याचे स्पष्ट केले.