पक्ष पातळीवर जिल्हा पंचायत निवडणुकीचा वटहुकूम फेटाळा

0
87

कॉंग्रेसची राज्यपालांकडे मागणी
जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासाठी भाजप सरकारने वटहुकूम जारी केल्यास राज्यपालांनी तो फेटाळून लावावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केली आहे.विधानसभा अधिवेशनापूर्वी वरील कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने कॉंग्रेसने वरील मागणी केली आहे. सध्याच्या पद्धतीने जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेणे चालू ठेवल्यास काहीही बिघडत नाही, असे विधान राष्ट्रपतींनी केले होते. त्यांच्या विधानाचा पार्सेकर सरकारने मान राखावा, असे फालेरो यांनी म्हटले आहे.
राज्यपाल मृदुला सिन्हा प्रसिद्ध लेखिका व समाजसेविका असल्याने त्या भाजप सरकारच्या दबावाला बळी पडणार नाही, असा विश्‍वास प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.