पं. बंगालचे नाव बांगला करण्याची मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल केली. ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. दरम्यान, यावेळी ममतांनी मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी मोदींकडे ममतांनी १३,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचीही मागणी केली. भाजप आणि ममता यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर मोदी-बॅनर्जी यांच्या भेटीकडे लक्ष लागून होते.
ममतांनी पंतप्रधान मोदींना भेटीदरम्यान, कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करत पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदींनीही नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचे ममता यांनी सांगितले.