किनारी व्यवस्थापन आराखडा लवकरच पंचायतींकडे ः काब्राल

0
108

एनसीएससीएमने तयार केलेला किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा येत्या २ ते ३ दिवसांत संबंधित पंचायतींना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.

राज्य सरकारने किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

केवळ ९ पंचायतींनी किनारी व्यवस्थापन आराखडे सादर केले आहेत. हे आराखडे एनसीएसएलएमकडे पाठविण्यात येणार आहेत. एनसीएसएलएमकडून तयार केला जाणारा आराखडा सीझेडएमएकडे पाठविला जाणार आहे. जमीन वापर आराखडा नंतर तयार करून सादर केला जाणार आहे.

किनारी विभागातील इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अधिकार्‍याची भेट सष्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेणार आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.