Home बातम्या पंजाबमधील पूरपरिस्थितीची मोदी उद्या करणार पाहणी

पंजाबमधील पूरपरिस्थितीची मोदी उद्या करणार पाहणी

0

पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा आकडा 46 वर पोहोचला आहे, तर 1.75 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. 23 जिल्ह्यांमधील 1,996 गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पंजाबचा पूरग्रस्त जिल्हा गुरुदासपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच पूरग्रस्त लोक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. पुरामुळे मृतांचा आकडा 46 वर पोहोचला आहे, तर 1.75 लाख हेक्टर शेती जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये वाहणाऱ्या रावी, सतलज, व्यास नद्या दुथडी भरून वाहत आहेत.