थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे आपचे भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री मान यांनी दिले.