पंचायतींच्या पोटनिवडणुका १० डिसेंबर रोजी घेणार

0
107

राज्यातील चार पंचायतीच्या चार प्रभागासाठी १० डिसेंबर २०१७ रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
पेडणे तालुक्यातील पालये पंचायतीच्या प्रभाग १ , सांगे तालुक्यातील उगे पंचायतीच्या प्रभाग ३, फोंडा तालुक्यातील मडकई पंचायतीच्या प्रभाग २ (राखील ओबीसी) आणि कुंडई पंचायतीच्या प्रभाग १ साठी निवडणूक घेतली जाणार आहे.
दरम्यान, १० डिसेंबर २०१७ रोजी निवडणूक होणार्‍या हर्ळण पंचायतीचा प्रभाग ५ अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच हळर्ण पंचायतीचा प्रभाग ७, कासारवर्णे पंचायतीचा प्रभाग ३ आणि चांदेल – हंसापूर पंचायतीचा प्रभाग ३ मागासवर्गीसासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.