न्यूझीलंड ४ बाद २२९

0
124

>> १७१ धावांची आघाडी

इंग्लंडचा पहिल्या डावात ५८ धावांत खुर्दा उडविल्यानंतर काल दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार केन विल्यमसनच्या दमदार १०२ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत ४ गडी गमावत २२९ अशी धावसंख्या उभारत आपली स्थिती मजबूत केली आहे. दुसर्‍या दिवसअखेर न्यूझीलंडला १७१ धावांची आघाडी मिळालेली आहे.

पहिल्या दिवसाच्या ३ बाद १७५ धावांवरून पुढे खेळताना काल पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडने ४ गडी गमावत २२९ अशी धावसंख्या बनविली होती. पहिल्या दिवसाचा नाबाद खेळाडू कर्णधार केन विल्यमसनने आपले १८वे कसोटी शतक साजरे केले व ११ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने १०२ धावा करून परतला. तो जेम्स अँडरसनचा पायचितचा शिकार ठरला. विल्यमसन परतल्यानंतर हेन्री निकॉल्स (४९) व बीजे वॉटलिंग (१७) खेळपट्टीवर नाबाद खेळत होते.