>> दुसरी लढत अनिर्णीत
>> इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णीत राखत न्यूझीलंडने दोन लढतींची मालिका १-० अशी जिंकली.
२ बाद ९६ धावांवरून काल पाचव्या दिवशी पुढे खेळताना काल न्यूझीलंडच्या दुसर्या डावात २ बाद २४१ धावा झाल्या असता पावसामुळे सामना लवकर थांपविण्यात आला. काल कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी संयमी खेळी करीत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. या दोघांनी दमदार शतके ठोकताना तिसर्या विकेटसाठी अविभक्त २१३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
विल्यमसनने ११ चौकारांच्या सहाय्याने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर रॉस टेलरने नाबाद शतकी खेळी करताना १२ चौकार व २ षट्कार खेचले. या शतकी खेळी दरम्याने टेलरने आपल्या कासोटी कारकिर्दीत ७००० धावांचा पल्लाही पार केला. त्याच बरोबर तो ७ हजारी कामगिरी करणारा स्टीफेन फ्लेमिंगनंतरचा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज बनला आहे.
न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्व गडी गमावत ३७५ धावा बनविल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने जो रूटच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर आपल्या पहिल्या डावात ४४७ अशी धावसंख्या उभारली होती.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड, पहिला डाव ः सर्वबाद ३७५ (टॉम लॅथम १०५, डॅरेल मिचेल ७३ धावा. स्टुअर्ट ब्रॉड ४-७३, क्रिस वोक्स ३-८३ बळी), इंग्लंड, पहिला डाव ः सर्वबाद ४७६, (जो रुट २२६, रॉरी बर्न्स १०१ धावा. नील वॅग्नर ५-१२४, टिम साउदी २-९० बळी), न्यूझलीडंल, दुसरा डाव, २ बाद २४१, (केन विल्यमसन नाबाद १०४, रॉस टेलर नाबाद १०५. क्रिस वोक्स १-१२, सॅम कर्रन १-५६ बळी).