Home Featured न्याय संहिता अंमलबजावणीतगोवा राष्ट्रीय स्तरावर प्रथम

न्याय संहिता अंमलबजावणीतगोवा राष्ट्रीय स्तरावर प्रथम

0

गोवा राज्याने न्याय संहितांच्या (नवीन फौजदारी कायदे) अंमलबजावणीमध्ये देशात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. केंद्र सरकारच्या ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च ॲण्ड डेव्हलमेंटकडून फेब्रुवारी 2026 मध्ये जारी केलेल्या राष्ट्रीय रँकिंग मूल्यांकनानुसार, न्याय संहितांच्या (नवीन फौजदारी कायदे) अंमलबजावणीमध्ये गोवा राज्याने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे. गोवा राज्याला एकूण 83.10 टक्के गुण मिळवले आहेत.

गोव्याने प्रशासकीय सुधारणांमध्ये 20 पैकी 20 गुण मिळवून परिपूर्ण गुण मिळवले आहेत. ज्यामध्ये वैधानिक सूचना जारी करण्यात आणि न्याय संहितांअंतर्गत मॉडेल नियमांचा अवलंब करण्यात पूर्ण अनुपालन आहे, असे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले
आहे.

नवीन गुन्हेगारी कायद्यांचे उद्दिष्ट नागरिकांना जलद, न्याय्य आणि अधिक प्रभावी न्याय मिळावा यासाठी अंमलबजावणी, क्षमता बांधणी आणि आंतर-एजन्सी समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी गोवा राज्य वचनबद्ध आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.