नोकर भरती बंदी निर्णयावर सरदेसाईंची टीका

0
152

राज्यातील नोकरभरती वर्षअखेरपर्यंत बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुख्य सचिवांच्या दडपणाखाली हा निर्णय घेतला असून मंत्री आणि आमदारांना पुढच्या १४ महिन्यांसाठी थेट होम क्वारंटाईन होण्यासाठी पाठविले आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
कुचकामी मंत्रिमंडळ सत्तेवर ठेवण्याऐवजी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि मंत्री, आमदारांना कायमचे होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.