नोकरी घोटाळाप्रकरणातील दीपश्रीच्या कोठडीत वाढ

0
4

पणजी पोलिसांनी सरकारी नोकरी घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या दीपश्री महांतो ऊर्फ सावंत हिच्या पोलीस कोठडीतील रिमांडमध्ये आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

रेवोडा बार्देश येथील एका व्यक्तीला लेखा खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून साधारण 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीतील रिमांड पूर्ण होत असल्याने संशयित दीपश्री हिला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी दीपश्री हिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

दरम्यान, संशयित आरोपी दीपश्री हिने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीला सुरुवात करण्यात आली असून पुढील सुनावणी येत्या 4 डिसेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.