नोकरभरती प्रकरणी चौकशी करा : कॉंग्रेस

0
13

>> डिचोली पोलिसांत तक्रार दाखल

नोकरभरती करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवली असून चौकशीची मागणी केली आहे. पात्र उमेदवारांना डावलून सर्वाधिक पैसे देणार्‍या लोकांना नोकर्‍या देण्यात आल्याचे कॉंग्रेसने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे बेरोजगार युवावर्गावर अन्याय झाल्याचे कॉंग्रेस नेते महेश म्हाब्रे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती देताना सांगितले. नोकरभरती घोटाळा कोट्यवधींचा असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भाजप सरकारचे अनेक घोटाळे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घोटाळ्यांची माहिती कॉंग्रेस देणार असल्याचे म्हाब्रे यांनी सांगितले. या वेळी मनोज नाईक, फिरोज बेग आदी उपस्थित होते.