विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना अगोदर सेवेत कायम केले जावे, अशी मागणी काल अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शून्य तासाला गोवा विधानसभेत केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.
दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहितीही खंवटे यांनी यावेळी दिली व सरकारने पर्रीकर यांनी त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी केली.