- शशांक गुळगुळे
वृद्धापकालाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून नॅशनल पेन्शन योजना केंद्र सरकारने कार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत 18 ते 70 वयापर्यंतच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना (नॅशनल पेन्शन स्कीम- एनपीएस) जानेवारी 2004 मध्ये सुरू केली. पेन्शन ही फक्त सहकारी नोकरीतील कर्मचारी, सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी यांनाच मिळते. खाजगी व अन्य ठिकाणी नोकरी करणाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. असंघटित कामगारांना पेन्शन मिळत नाही. या सर्वांना वृद्धापकालाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून नॅशनल पेन्शन योजना केंद्र सरकारने कार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत 18 ते 70 वयापर्यंतच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
हे खाते सार्वजनिक उद्योगातील बँका, पोस्ट ऑफिस, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक यांसारख्या मोठ्या खाजगी बँका, कार्व्ही, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन या ठिकाणी उघडता येते. याशिवाय एनएसडीएल तसेच कार्व्हीच्या साईटवर लॉग-इन करून ऑनलाईन-ई-एनपीएस खाते उघडता येते. हे खाते निवासी, तसेच अनिवासी भारतीय केवळ एकाच्याच नावाने उघडू शकतात. हे खाते संयुक्त नावाने उघडता येत नाही. यात जास्तीत जास्त ठेव रुपये दीड लाख प्रत्येक आर्थिक वर्षी जमा करता येऊ शकते. ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यातून रिटायरमेंट प्लॅनिंग करता येते. यातील गुंतवणूक प्राप्तिकर कलम 80 सी व 80 सीसीडी (1) बी अंतर्गत करसवलतीस पात्र आहे. हे खाते भारतभर कुठेही ऑपरेट करता येते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन अनुभवी व व्यावसायिक फंड मॅनेजर करतात. यातून सरासरी 9.5 ते 10.5 टक्क्यांच्या दरम्यान परतावा मिळतो. जो पीपीएफ, एनएससी, बँक एफडी या अन्य पर्यायांपेक्षा जास्त असतो. खातेदाराने केलेल्या गुंतवणुकीवर तहहयात पेन्शन मिळते. यात टिअर-1 खाते उघडणे बंधनकारक आहे, तर टिअर-2 उघडणे वैकल्पिक आहे. पेन्शन फक्त टिअर- 1 खात्यात असणाऱ्या रकमेतूनच मिळते व टिअर-1 मधील शिल्लक रक्कम काही ठराविक कारणांसाठीच व ठराविक कालावधीनंतर (फक्त तीन वेळाच) काढता येते. टिअर- 2 खात्यातील रक्कम बचत खात्याप्रमाणे कधीही काढता येते. या खात्यात नॉमिनेशन करता येते. जास्तीत जास्त तीन नॉमिनी करता येतात व त्यांना द्यावयाच्या रकमेची टक्केवारीसुद्धा ठरवून देता येते.
या योजनेत गुंतवणूक करणे हा एक स्मार्ट आर्थिक निर्णय आहे जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. 60 वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही अंशतः किंवा मुदत संपण्यापूर्वी तुमच्या जमा रकमेपैकी काही टक्के रक्कम काढू शकता. खातेदाराचा खाते सुरू असताना मृत्यू झाल्यास, संपूर्ण जमा झालेला पेन्शन कॉर्पस नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला परत केला जातो. ही योजना निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी म्हणून भारत सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जमा झालेली रक्कम, मान्यताप्राप्त शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर्स यात विभागून गुंतविली जाते. ही योजना पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकारण यांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. ही स्वैच्छिक योगदान योजना आहे. ही योजना सर्वांसाठी खुली आहे. परंतु सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2009 पासून ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली. यात वर्षाला किमान रुपये 6 हजार गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणूक कितीही करता येते, पण जुन्या कर-रचनेनुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर-सवलत मिळते. हे पेन्शन खाते असल्यामुळे यातून पैसे काढण्यावर बंधने आहेत. टिअर-1 मधून 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत निधी काढता येत नाही. टियर-1 सक्रिय ठेवण्यासाठी वार्षिक गुंतवणूक आधीच्या किमान 6 हजार रुपयांवरून आता 1 हजार रुपये करण्यात आली आहे. टिअर-2 खाते बचत खात्याप्रमाणे आहे. टिअर-1 खाते उघल्यानंतरच टिअर- 2 खाते उघडता येते. गुंतवणूकदाराला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम मिळते. उरलेल्या रकमेवर दरमहा पेन्शन दिली जाते.
यात गुंतवणूक वयाच्या 70 वर्षांपर्यंत करता येऊ शकते. वयाच्या साठीनंतर जे हे खाते उघडतात ते वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत हे खाते सुरू ठेवू शकतात. 65 वर्षानंतर खाते उघडणाऱ्यांसाठी 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. एक व्यक्ती एकच ‘एनपीएस’ खाते उघडू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती ‘एनपीएस’ खाते उघडते तेव्हा त्याला (पीआरएएन) कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक दिला जातो. आधारकार्डचा पुरावा देऊन हे खाते उघडता येते. तुम्ही घरी बसून हे खाते उघडू शकता.
या योजनेचे फायदे
या योजनेतील निधी सक्षम व पात्र फंड व्यवस्थापकांद्वारे गुंतविला जातो. हा निधी व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केला जातो. ‘एनपीएस टिअर- 2′ खाते चांगल्या व उच्च परताव्याची अनुमती देते. या योजनेचा गुंतवणूक खर्च फार कमी आहे. या योजनेचे पेपरवर्क फार साधे. योजनेत सहभागी होण्यास 18 ते 70 वर्षांच्या सर्वांना सहज संधी उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर करलाभ, लवचीक योगदान पर्याय, गुंतवणूक पर्याय, कमी खर्च, लवचीक वार्षिकी पर्याय, गुंतवणूक पर्याय, कमी खर्च हे फायदे आहेत. असे बरेच गुंतवणूकदार आहेत ज्यांना सिक्युरिटीज, इक्विटी, डेट इत्यादींशी संबंधित अटी माहीत नाहीत. त्यामुळे असे गुंतवणूकदार ‘एनपीएस’ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ‘एनपीएस’ फंड व्यवस्थापन निवडण्यात अपयशी ठरतात.
ऑनलाईन खाते उघडण्यासाठी- हीींंीि://शपीि.पीवश्र.लेा/शपीि/परींळेपरश्र शिपीळेप भेट द्या. तुमचा मोबाईल नंबर, आधार आणि परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) ‘एनपीएस’ खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. अशी ही सोपी प्रक्रिया आहे.