नुपूर तलवारच्या जामीन अर्जावर आज निकाल

0
59

आरुषी तलवार व हेमराज हत्या प्रकरणातील आरोपी नुपूर तलवार यांना कालची रात्रही तुरुंगात घालवावी लागली. त्यांच्या जामीन अर्जावरील निवाडा गाझीयाबाद न्यायालयाने बुधवारपर्यंत राखून ठेवला. विशेष सीबीआय न्यायालयाने काल नुपूर तलवार यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी नुपूर या न्यायालयात नव्हत्या. जामीनावर बाहेर असलेले नुपूर यांचे पती राजेश हेही न्यायालयात आले नव्हते. विशेष सीबीआय न्यायाधीश एस. लाल यांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकला.

नुपूर तलवार ही आरुषीची आई आहे व तिने आरुषीच्या आधल्या दिवशीच तिला नवा कॅमेरा भेट दिला होता याकडे लक्ष वेधत नुपूर यांच्या वकिलांनी या हत्या प्रकरणी नुपूर यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयास सांगितले. तलवार दांपत्याने पुराव्यांशी छेडछाड केल्याचा दावा सीबीआयच्या वतीने करण्यात आला. आज जामीन अर्जावर निवाडा दिला जाईल.