नुनीसचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0
8

तेलंगणा उच्च न्यायालयाने कर्लिस शॅकच्या एडविन नुनीस याचा अमलीपदार्थ प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळला. हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलीस अमलीपदार्थ प्रकरणी हणजूण येथील एडविन नुनीस याला अटक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. त्यात संशयित म्हणून किनारी भागातील काही शॅकचालक, मालकांचा समावेश आहे. हैदराबाद पोलिसांनी वागातोर येथील हिलटॉप नाईट क्लबचा मालक स्टीव्ह डिसोझा याला यापूर्वीच अमलीपदार्थ प्रकरणी अटक करून हैदराबाद येथे नेले आहे. त्यानंतर नुनीस याला अटक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. तेलंगणा येथील उच्च न्यायालयाने नुनीसचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.