नीट प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर रोजी

0
80

संपूर्ण देशात १२ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल ही घोषणा केली. या परीक्षेसाठी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून पींरपशशीं.पळल.ळप या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असणार आहे.

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत होते; मात्र त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू करण्यात आली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. माहिती पत्रक आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.