Home बातम्या नीट पीजी परीक्षेत गोव्यातून डॉ. अंजनेय कामत प्रथम

नीट पीजी परीक्षेत गोव्यातून डॉ. अंजनेय कामत प्रथम

0

कोलवा येथील डॉ. अंजनेय जयंत कामत यांनी नीट-पीजी 2025 परीक्षेत अखिल भारतात 212 वा (एआयआर) क्रमांक तर गोव्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोव्यात वैद्यकीय क्षेत्रातून आणि एमबीबीएस पूर्ण केलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मित्र परिवार व प्राध्यापक वर्गाकडून कौतुक करण्यात आले.राष्टिय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. कामत यांच्या यशाची भर पडली आहे.