नीट परीक्षेत गोव्यातून ग्रासिना कुलासो प्रथम

0
8

‘नीट’ परीक्षेत गोवा राज्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान ग्रासिना कुलासो या अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनीने मिळवला आहे. नीट परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणारी अनुसूचित जमातीतील ती पहिलीच उमेदवार ठरली आहे. ग्रासिना ही वास्को येथील सेंट अँन्ड्य्‌ू उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. नीट परीक्षेत तिला 680 गुण मिळाले असून, देशात तिचा 1738 वा क्रमांक आलेला आहे. तिच्या गुणांची टक्केवारी ही 99.91 एवढी आहे.