पणजी पोलीस स्थानकावरील पोलीस उपनिरीक्षक उत्कांतराव देसाई यांना कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांच्या सूचनेनुसार निलंबनाची ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक देसाई यांनी पणजी पोलीस स्थानकावर कार्यरत असताना २०१९ मध्ये २९ गुह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांच्या प्रकरणात आरोपपत्र न्यायालयात सादर केलेली नाहीत, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी देसाई यांची खात्यार्तंगत चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.