निर्भयाच्या दोषींना अखेर ७ वर्षांनी दिली फाशी

0
128

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना काल शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्भया प्रकरणी चारही दोषींना काल पहाटे तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते. दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. चालू वर्षात २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेली ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरली होती.