केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गडकरी यांनी स्वतःला विलगीकरण केले असून आपली प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.