सांत आंद्रे मतदारसंघातील नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
नावशी येथे मरिना प्रकल्प होणार नाही. त्यामुळे जनसुनावणी व इतर प्रक्रिया रद्दबातल करण्यात आली आहे. सरकारकडून इतर विकास प्रकल्पांची कामे पुढे नेण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.