विधानसभा अधिवेशनात आज लोकायुक्त विधेयक मांडणार

0
108

गोवा विधानसभेत आज बुधवार २७ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयक २०२१ मांडणार आहेत.
गोवा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयकामुळे लोकायुक्त कायद्याला बळकटी मिळणार असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेला आहे.
तर, या गोवा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयकामुळे लोकायुक्त कायदा कमकुवत होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. कॉंग्रेस पक्ष विधानसभेत गोवा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयकाला विरोध करणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली आहे. तर, गोवा फॉरवर्डतर्फे नवीन गोवा लोकायुक्त विधेयक सादर केले जाणार आहे.

तसेच, मुख्यमंत्री डॉ. सावंत गोवा (रेग्युलेशन ऑफ हाउस बिल्डिंग ऍडव्हास) विधेयक २०२१ सादर करणार आहेत. राज्य सरकारतर्फे सरकारी कर्मचार्‍यांना गृहबांधणीसाठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. सदर गृहबांधणी कर्ज योजना बंद करण्यात आली आहे. सदर कर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी हे विधेयक सादर केले जात आहे.
या अधिवेशनात सकाळच्या सत्रात प्रश्‍नोत्तरे व इतर कामकाज होणार आहे.