नाताळात मांसाचा तुटवडा जाणवणार नाही ः मुख्यमंत्री

0
126

नाताळ सणात ख्रिस्ती धर्मियांना मांसाचा तुटवडा जाणवू नये यासाठी नोंदणीकृत एजंटांना येथील गोवा मांस प्रकल्पात कत्तल करण्यासाठी शेजारच्या राज्यातून बैल आणण्यास परवानगी दिली असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

आवश्यक ती परवानगी घेऊन नोंदणीकृत एजंटांनी राज्याबाहेरून कत्तल करण्यासाठी बैल आणावेत व मांस प्रकल्पात त्यांची कत्तल करावी. उघड्यावर व अस्वच्छ वातावरणात कत्तल केली जाऊ नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, गोवंक्ष रक्षा अभियानने काल येथील आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत गोव्यात कत्तलीसाठी गुरे आणण्यास व कत्तल करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
सरकारी कर्मचार्‍यांना

आज मिळणार वेतन
दरम्यान, २५ डिसेंबर रोजी नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना डिसेंबर महिन्याचे वेतन आज २३ डिसेंबर रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे.