राज्यात नाताळचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. नाताळनिमित्त आयोजित खास प्रार्थनासभेला ख्रिस्ती समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त चर्च, कपेल यांच्यावर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांनी घरांघरातून येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचे दर्शन घडविणारे आकर्षक गोठे तयार केले आहेत. ख्रिस्ती बांधवांनी घऱाघरांतून विद्युत रोशणाई, नक्षत्र व इतर साहित्याचा वापर करून आकर्षक सजावट केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आर्चबिशप फादर फिलीप नेरी फेर्रांव यांनी नातळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर
राज्यातील सुरक्षेत वाढ
राज्यात नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही भागात अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात पर्यटकांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने सनबर्न क्लासिक सारख्या ईडीएम संगीत महोत्सवाच्या आयोजनासाठी मान्यता दिली जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून संगीत महोत्सवाच्या ठिकाणी अमली पदार्थाच्या व्यवहारावर कडक नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
गृह खात्याच्या अधिकार्याची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून अधिकार्यांना योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून किनारी भागात जादा वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पोलीस यंत्रणेने भाडेपट्टीवर वाहने घेणार्या पर्यटकांची सतावणूक करू नये. वाहनाबाबत काही समस्या असल्यास थेट वाहन मालकाला नोटीस पाठवावी, असे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले.राज्यात नाताळचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. नाताळनिमित्त आयोजित खास प्रार्थनासभेला ख्रिस्ती समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त चर्च, कपेल यांच्यावर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांनी घरांघरातून येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचे दर्शन घडविणारे आकर्षक गोठे तयार केले आहेत. ख्रिस्ती बांधवांनी घऱाघरांतून विद्युत रोशणाई, नक्षत्र व इतर साहित्याचा वापर करून आकर्षक सजावट केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आर्चबिशप फादर फिलीप नेरी फेर्रांव यांनी नातळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.