नाणुस येथे बुडून एकाचा मृत्यू

0
33

>> दोघांना वाचवण्यात यश, बुडालेले तिघेही एकाच कुटुंबातील

नाणुस बेतकीकरवाडा वाळपई येथे काल मंगळवारी सायंकाळी तीन भावंडे म्हादई नदीच्या पात्रात बुडण्याची घटना घडली. या तीन भावंडांपैकी एकाचा मुत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र वाचनवलेल्या एका मुलाची स्थिती गंभीर असून एकाला उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी चार वाजता इरफान मकबूल शेख (१५), आसिफ शेख (१३) व रेहान शेख (१०) ही तीन भावंडे म्हादई नदीवर पोहण्यासाठी गेली होती. पण त्यांना पोहता पोहता पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्याच वेळी त्या ठिकाणी लाड कुटुंब पोहोचले व तिघांनाही वाचविण्यासाठी प्रयत्न लाड कुटुंबियांनी केले. पण त्यात इरफान शेख याचा मृत्यू झाला. रेहान शेख हा पाण्यात पडल्याने गंभीर अवस्थेत त्याला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. इरफान शेख हा पाण्यात दूरवर वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह वाळपई अग्निशामक दलाने बाहेर काढला तर रेहान ह्याला पाण्यातून बाहेर काढून गोमेको बांबोळी येथे नेण्यात आले. तिसरा भाऊ आसिफ ह्याला उपचार करून घरी जाऊ दिले.

वाळपई पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांचे वडील मकबूल शेख हे रंगरंगोटीचे काम करतात व त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.