Home Featured नाट्य स्पर्धेतील गैरप्रकारात अधिकारीदोषी आढळल्यास कारवाई : कवळेकर

नाट्य स्पर्धेतील गैरप्रकारात अधिकारीदोषी आढळल्यास कारवाई : कवळेकर

0

कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धा निकालात बदल घडवून आणण्यासाठी लाच देण्याचा जो कथित प्रयत्न झाला होता, त्या प्रकरणाची कसून चौकशी चालू आहे, असे कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी काल सांगितले. या प्रकरणात जर कोणी दोषी असल्याचे आढळून आले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही कवळेकर म्हणाले.

या प्रकरणात कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी आणि नाट्यगृह व्यवस्थापक या दोघांवर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली असून, उत्तर देण्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे.
दरम्यान, कला अकादमी या संपूर्ण घटनेची चौकशी करीत असल्याची माहिती बाबू कवळेकर यांनी दिली. कलेसाठी वाहिलेल्या कला अकादमीत असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, कला अकादमी ही कलाकारांसाठी असून, तेथे विविध उपक्रम व्हायला पाहिजेत, असे सांगून बंद पडलेला सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठीची तयारी आपण सुरू केली असल्याची माहिती कवळेकर यांनी दिली.