नवी आयएनएस विक्रांत स्वातंत्र्यदिनी नौदलाच्या ताफ्यात

0
10

नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी नवी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आता नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारी आयएनएस विक्रांतची चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भर समुद्रात विविध उपकरणांच्या चाचण्या झाल्यावर विक्रांत काल कोची बंदरातल्या कोची शिपयार्डच्या तळावर परतली. जुलै महिन्याच्या अखेरीस विक्रांत ही नौदलाकडे सूपुर्त केली जाईल. त्यानंतर येत्या १५ ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.