Home बातम्या नवीन पाटो पुलाचा एकमार्ग वाहतुकीसाठी बंद

नवीन पाटो पुलाचा एकमार्ग वाहतुकीसाठी बंद

0

पणजीतील नवीन पाटो पुलाचा पणजीत शहरात प्रवेश करणारा भागातील रस्ता 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, या काळात नवीन पाटो पुलाच्या नदीच्या काठावरील दुसऱ्या भागावरून दोन्ही बाजूने वाहनांच्या वाहतुकीला मान्यता देण्यात येणार आहे. नवीन पाटो पुलाच्या एका भागाच्या दुरुस्ती कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. जुन्या पाटो पुलावरून शहरात वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. शहरातून बाहेर जाणारी वाहने मळा येथील पुलावरून वळविण्यात येणार आहेत, असे वाहतूक विभागाने कळविले आहे.