नवा मुख्यमंत्री आज ठरणार

0
79

लक्ष्मीकांत पार्सेकर की राजेंद्र आर्लेकर
सकाळी विधीमंडळ, संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक
आज सकाळी भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक पर्वरी येथे होणार असून संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या नेत्यांची निवड करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या मुख्यमंत्र्यांचे शपथग्रहण उद्या शनिवारी होणार आहे. तर मनोहर पर्रीकर यांचे केंद्रीय मंत्री म्हणून रविवारी शपथग्रहण होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
पार्सेकर नवे मुख्यमंत्री?नव्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व सभापती राजेंद्र आर्लेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदाची माळ लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठता व मंत्री म्हणून त्यांना असलेला अनुभव या निकषावर मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड करण्याबाबत विचार चालू असल्याचे वृत्त आहे.
यासंबंधी पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
दरम्यान, सभापती राजेंद्र आर्लेकर यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी याविषयी कोणाकडूनही विचारणा झालेली नसल्याचे सांगितले. मात्र पक्षाकडून कोणतीही जबाबदारी दिल्यास ती पूर्ण क्षमतेनिशी निभावणार असल्याचे ते म्हणाले.