नवप्रभेचे 55 व्या वर्षात शानदार पदार्पण

0
9

>> वर्धापनदिन सोहळ्यास सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

दैनिक नवप्रभाने काल स्वातंत्र्यदिनी 55 व्या वर्षात शानदार पदार्पण केले. ह्यानिमित्ताने नवहिंद भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीसत्यनारायण महापूजेस व अनौपचारिक स्नेहमेळाव्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती श्री. रमेश तवडकर, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार श्री. सदानंद तानावडे, विरोधी पक्ष नेते श्री. युरी आलेमांव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे नेते श्री. विजय सरदेसाई, श्री. दुर्गादास कामत, भाजपचे नावेलीचे आमदार श्री. उल्हास तुयेकर, माजी केंद्रीय मंत्री श्री. रमाकांत खलप, माजी उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, उद्योगपती श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो, श्री. यतीश धेंपो आदींसह असंख्य हितचिंतकांनी उपस्थिती लावून नवप्रभेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांमध्ये इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष श्री. दशरथ परब, सदस्य सचिव श्री. अशोक परब, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश वंसकर, दैनिक नवप्रभेचे माजी संपादक श्री. सुरेश वाळवे, माजी वरिष्ठ सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर, श्री. विजय कळंगुटकर, गोवा विधानसभेचे माजी उपसभापती श्री. शंभू भाऊ बांदेकर, उद्योजक श्री. जयंत व सौ. दीपा मिरिंगकर, माजी आमदार श्री. धर्मा चोडणकर, डॉ. शेखर साळकर, श्री. भरतेश बोके, श्री. उमाकांत शेट्ये, श्री. नारायण नार्वेकर, श्री. केदार धुमे, ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक श्री. दिलीप बोरकर, डॉ. नितीन लक्ष्मीदास बोरकर, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गोवा मराठी पत्रकार संघाचे श्री. सुभाष नाईक, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक श्री. जय हळदणकर, श्री. सुदेश भोसले, त्यांच्या भगिनी सौ. सारिका नाईक, प्राचार्य श्री. शशिकांत सरदेसाई, श्री. शशिकांत अर्जुनराव सरदेसाई, ॲड. सुभाष पुंडलिक सावंत, ज्येष्ठ पत्रलेखक श्री. सुभाष पंढरी देसाई, साहित्यिक श्री. शरच्चंद्र देशप्रभू, ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरुदास सावळ, पत्रकार श्री. भारत बेतकेकर, श्री. सतीश नाईक, सुहासिनी प्रभुगावकर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. विजय कापडी, श्री. ज. अ. रेडकर, पत्रकार श्री. प्रदीप नाईक, श्री. जगदीश दुर्भाटकर, वितरक श्री. गोरखनाथ नाईक (म्हापसा) व भास्कर डेगवेकर, श्री. वासुदेव साळगावकर (वास्को) श्री. भास्कर डेगवेकर, श्री, गिरीश उसकईकर, सौ. शुभांगी उसकईकर व कु. शांभवी, श्री. राजेंद्र नायक, ज्येष्ठ साहित्यिक श्री. नारायण महाले, डॉ. पांडुरंग फळदेसाई, श्री. तुषार टोपले, आर्टट्रिक्स ॲडव्हर्टायझिंगचे श्री. ज्योस फर्नांडिस, सौ. कांचन सातार्डेकर, सौ. परवीश कामत, श्री. प्रवीण व सौ. नीला भोजराज आदी अनेकांचा समावेश होता. नवहिंद प्रकाशन समूहाच्या संचालिका सौ. पल्लवी धेंपो, धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, दै. नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. विजय डिसोझा व समस्त कर्मचारीवर्गाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यंदाच्या श्रींच्या पूजेचे यजमानपद नवहिंद प्रकाशन समूहाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गोपी कलवार व सौ. शांती कलवार यांनी भूषविले. श्री. कालिदास मराठे, डॉ. सोमनाथ कोमरपंत, श्री. संजीव सरदेसाई, श्री. अरविंद सायनेकर, श्री. वल्लभ केळकर, श्री. अनिरुद्ध जोग आणि असंख्य मान्यवरांनी दूरध्वनीवरून व शुभेच्छा संदेश पाठवून नवप्रभेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.