नरेंद्र मोदींनी घेतल्या 83 निवडणूक प्रचार सभा

0
12

31 मार्च ते 7 मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. 83 निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा काल शेवटचा दिवस आहे. प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शाह यांनी 66 सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि ‘रोड शो’मध्ये भाग घेतला आहे, याबाबत भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी 29 प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.