नगरपालिका कर्मचार्‍यांना कॉमन कॅडर लागू करण्याचा विचार

0
69

>> फ्रान्सिस डिसोझांचे आश्‍वासन

 

नगरपालिका कर्मचार्‍यांना कॉमन कॅडर लागू करण्यासाठी विचार करण्याचे आश्‍वासन फ्रान्सिस डिसोझा यांनी नगरविकास खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले. काही आमदारांनी तशी मागणी केली असता त्यांनी वरील आश्‍वासन दिले.
दरम्यान, आम्ही कुळ-मुंडकार कायद्यात जी दुरुस्ती केलेली आहे ती सामान्य लोकांना नजरेपुढे ठेवूनच केलेली आहे. सर्व खटले कोर्टात पोचण्यास एका वर्षाचा काळ लागला. थोडा काळ थांबून काय होते ते पाहुया. नंतरच पुढे काय करायचे ते पाहू असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल महसूल खात्यावरील उत्तराच्या वेळी हस्तक्षेप करताना सांगितले.
दिवाणी न्यायालयात हे खटले कसे चालतात ते पाहूया, अशी सुचना यावेळी पार्सेकर यांनी केली. महसूल मंत्री त्यासंबंधी उत्तर देत असताना हस्तक्षेप करून त्यांनी वरील स्पष्टीकरण केले. तेरेखोल येथील लिडिंग हॉटेल प्रकरणी जो चौकशी आयोग स्थापन करण्याचा विचार केला होता त्याला लिडिंग हॉटेल तसेच त्याला विरोध करणार्‍यांनीही विरोध केल्याने चौकशी आयोग स्थापन करण्याचा विचार खात्याने बदलल्याचे डिसोझा यांनी सांगितले. नगरसेवकांचे वेतन वाढवण्याची गरज असेल तर त्याविषय अवश्यक विचार करू असे आमदार विजय सरदेसाई यांच्या मागण्यावर डिसोझा यांनी सांगितले. मी कधीही कुठल्याही नगरपालिकांच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही, असे नगरविकास खात्याच्या मागण्यांवरील उत्तर देताना खात्याचेमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांनी सांगितले. नगरपालिकांच्या मुख्यधिकार्‍यांची पुन्हा पुन्हा बदली का केली जाते, असा प्रश्‍न यावेळी विजय सरदेसाई यांनी केला. नगरपालिका अस्थिर करण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.