धोनीचा धमाका; आरसीबीवर चेन्नई भारी

0
106
Chennai Super Kings batsman and captain Mahendra Singh Dhoni (R) plays a shot as Royal Challengers Bangalore wicket keeper Quinton De Kock looks on during the 2018 Indian Premier League (IPL) Twenty20 cricket match between Royal Challengers Bangalore versus Chennai Super Kings at The M. Chinnaswamy Stadium in Bangalore on April 25, 2018. Chennai Super Kings batsman Suresh Raina (R) plays a shot / AFP PHOTO / Manjunath KIRAN / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ३४ चेंडूंतील नाबाद ७० धावा व सलामीवीर अंबाती रायडूने ठोकलेल्या ८३ धावांच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर काल बुधवारी ५ गडी व २ चेंडू राखून विजय मिळविला. विजयासाठी मिळालेले २०६ धावांचे लक्ष्य चेन्नईने १९.४ षटकांत गाठले. उमेश यादवने कोरी अँडरसनच्या गोलंदाजीवर अंबाती रायडूला वैयक्तिक ६१ धावांवर दिलेले जीवदान आरसीबीच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

तत्पूर्वी, एबी डीव्हिलियर्सच्या ३० चेंडूंतील ६८ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर बंगलोरने इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील या २४व्या सामन्यात ८ बाद २०५ धावा फलकावर लगावल्या. डीव्हिलियर्सने आपल्या खेळीत ८ षटकार व दोन चौकार लगावले. दुसर्‍या गड्यासाठी क्विंटन डी कॉक (५३ धावा, ३७ चेंडू, १ चौकार, ४ षटकार) याच्यासह ‘एबी’ने १०३ धावांची भागीदारी रचली. याव्यतिरिक्त मधल्या फळीत मनदीप सिंगने १७ चेंडूचा सामना करताना ३ षटकार व १ चौकारांसह मौल्यवान ३२ धावा जमवल्या. बंगलोरच्या डावातील शेवटच्या षटकात तीन खेळाडू बाद झाले. शेवटच्या तीन चेंडूंवर सुंदरने १२ धावा जमवून संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. चेन्नईने या सामन्यासाठी दोन बदल करताना कर्ण व फाफ ड्युप्लेसी यांना वगळून हरभजन सिंग व इम्रान ताहीरला खेळविले. बंगलोरने मनन वोहरा व ख्रिस वोक्स यांना बाहेर बसवून पवन नेगी व कॉलिन डी ग्रँडहोमला उतरविले.

दोन षटके ‘विकेट मेडन’
शार्दुल ठाकूरने डावातील पाचवे षटक निर्धाव टाकताना विराट कोहलीचा महत्त्वपूर्ण बळी घेतला. ब्राव्होने टाकलेल्या डावातील १४व्या षटकात बंगलोरच्या फलंदाजांना एकही धाव करता आली नाही तसेच या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला आपली विकेट गमवावी लागली.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः क्विंटन डी कॉक झे. व गो. ब्राव्हो ५३, विराट कोहली झे. जडेजा गो. ठाकूर १८, एबी डीव्हिलियर्स झे. बिलिंग्स गो. ताहीर ६८, कोरी अँडरसन झे. हरभजन गो. ताहीर २, मनदीप सिंग झे. जडेजा गो. ठाकूर ३२, कॉलिन डी ग्रँडहोम धावबाद ११, पवन नेगी धावबाद ०, वॉशिंग्टन सुंदर नाबाद १३, उमेश यादव झे. बिलिंग्स गो. ब्राव्हो ०, मोहम्मद सिराज नाबाद ०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ८ बाद २०५
गोलंदाजी ः दीपक चाहर २-०-२०-०, शार्दुल ठाकूर ४-१-४६-२, हरभजन सिंग २-०-२४-०, रवींद्र जडेजा २-०-२२-०, शेन वॉटसन २-०-२१-०, इम्रान ताहीर ४-०-३५-२, ड्वेन ब्राव्हो ४-१-३३-२
चेन्नई सुपर किंग्स ः शेन वॉटसन झे. सिराज गो. नेगी ७, अंबाती रायडू धावबाद ८२, सुरेश रैना झे. मनदीप गो. यादव ११, सॅम बिलिंग्स यष्टिचीत डी कॉक गो. चहल ९, रवींद्र जडेजा त्रि. गो. चहल ३, महेंद्रसिंग धोनी नाबाद ७०, ड्वेन ब्राव्हो नाबाद १४, अवांतर ११, एकूण १९.४ षटकांत ५ बाद २०७
गोलंदाजी ः पवन नेगी ३-०-३६-१, उमेश यादव ४-०-२३-१, वॉशिंग्टन सुंदर १-०-१४-०, मोहम्मद सिराज ४-०-४८-०, युजवेंद्र चहल ४-०-२६-२, कोरी अँडरसन ३.४-०-५८-०