धुळेर येथे हीट अँड रन,युवकाचा जागीच मृत्यू

0
9

धुळेर म्हापसा येथे काल रविवारी दि. 21 रोजी भाजीवाहू टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने मुबारक मतियाखान हा 20 वर्षीय युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, मात्र पोलिसांनी अपघाताला जबाबदार गाडीची ओळख पटवली. त्यानुसार, म्हापसा पोलीस संशयिताच्या शोधार्थ कर्नाटकात रवाना झाले आहेत. हा अपघात काल सकाळी 6च्या सुमारास घडला.
मुबारक हा आपल्या स्कूटरवरून (जीए 03 क्यू 9013) म्हापशाच्या दिशेने येत होता. तर भाजीवाहू टेम्पो (केए 22 बी 5207) करासवाडा दिशेने जात होता. दोन्ही वाहने धुळेर येथील दुचाकी रुमजवळ पोहचली असता टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यात स्कूटरचालक रस्त्यावर फेकला गेला व तिथेच त्याचा मृत्यू झाला.