धावत्या रो-रो रेल्वेतील ट्रकला मयेजवळ आग

0
100

बर्नींग ट्रेनचा थरार काल मयेवासीयांना पाहायला मिळाला. अवजड वाहनांची वाहतुक करणार्‍या रेल्वेतील एका ट्रकला अचानक आग लागली. हळदणवाडी जंक्शन ते तिखाजन जंक्शनपर्यंत हा थरार मयेवासियांनी अनुभवला.

ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून ट्रॅकवर चालत जाऊन रेल्वे चालकाला याची माहिती दिली व तिखाजन रेल्वे गेट क्रॉसवरून आगीचे तांडव थांबविले. डिचोली अग्नीशमन दल, ओल्ड गोवा अग्नीशमन दलांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तोपर्यंत वाहनाचे कॅबीन जळून खाक झाले.

ही रोरो रेल्वे गाडी पनवेल-मुंबई येथून सुटली होती व ती सोटलतक कर्नाटक स्टेशनपर्यंत जाणार होती. थिवी येथून सुमारे साडेबाराच्या दरम्यान ही रेल्वे सुटली होती. याच दरम्यान या रेल्वेवर असलेल्या चाळीस वाहनांतर्फे मध्येच असलेल्या एका वाहनाच्या कॅबीनमध्ये शॉट सर्कीट होवून आग लागली. हळदणवाडी रेल्वे गेटपासून ह्या वाहनाला आग लागली असल्याचे तेथील नागरीकांनी सांगितले.