धारगळच्या माजी सरपंचाची आत्महत्या

0
94

धारगळ पंचायतीचे माजी सरपंच नीलेश नाईक (वय ४०) यांनी काल गळफास लावून आत्महत्या केली. सुकेकुळण, धारगळ येथे वटवृक्षाच्या फांदीला साडीचा गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. काल दुपारी दीड वाजता हा प्रकार उघडकीस आला.
नीलेश नाईक यांची पहिली पत्नी हल्लीच आजाराने मरण पावली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी दुसरे लग्न केले होते. आत्महत्येमागचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पेडणे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे इस्पितळात पाठविला आहे. अधिक चौकशी पेडणे पोलीस करीत आहेत.