दोन वर्षांवरील मुलांना लवकरच लस मिळणार?

0
10

लवकरच दोन वर्षांवरील मुलांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. या वयाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन सुरक्षित असल्याचे परीक्षणामध्ये समोर आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, कोवॅक्सिन लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. कोवॅक्सिन लस मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास सफल ठरली.