दोन दिवसांची सागर कवच मोहीम आज संपणार

0
80

दोन दिवसांची ‘सागर कवच’ मोहीम कालपासून राज्यात सुरू झाली. आज समारोप होणार असलेल्या या मोहिमेत काल नाविक दल, सागरी पोलीस, किनारपट्टी पोलीस, तटरक्षक दल सहभागी झाले होते. सागरी मार्गाने देशात अतिरेकी घुसून त्यांनी मुंबईत अतिरेकी हल्ला घडवून आणण्याची घटना घडल्यापासून किनारपट्टी राज्यात ‘सागर कवच’ मोहीम दरवर्षी राबवण्यात येते आहे.समुद्रमार्गे देशात घुसू पाहणार्‍या अतिरेक्याना कसे अडवता येईल याची प्रात्यक्षिके या मोहिमेद्वारे केली जातात. या मोहिमेत नाविक दल, तटरक्षक दल, सागरी पोलीस, किनारपट्टी पोलीस मिळून मोठी फौज सहभागी होत असते. अतिरेक्यांची बोट (खर्‍या नव्हे) शोधण्याचे आव्हान या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांपुढे असते. या बोटीचा शोध किती वेळात घेण्यात आला त्याची नोंद ठेवली जाते. समुद्रमार्गाने घुसखोरी करू पाहणार्‍या अतिरेक्यांना पकडण्यास आजच्या विविध खात्यातील जवान किती सक्षम आहेत याची एका प्रकारे परीक्षा घेणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.