दोडामार्ग अपघातात एक ठार, एक गंभीर

0
98

गावाळ, दोडामार्ग येथे मोटारसायकल व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात समीर दशरथ परमेकर (२५) हरिजनवाडा, खानयाळे-भेडशी हा युवक ठार झाला तर शुभम सदानंद जाधव (२२) हा गंभीर जखमी झाला.
डिचोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर मोटारसायकलने वरील दोघे म्हावळींगे येथून दोडामार्गला जात होते. ते गावाळ येथे पोचले असता जीए – ०४ – ४३६८ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला धडक बसल्याने मोटारसायकल चालक समीर दशरथ परमेकर हा ठार झाला. तर शुभम सदानंद जाधव गंभीर जखमी असून त्याला बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राणे यांनी पंचनामा केला. शवचिकित्सेनंतर समीर परमेकर याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निरीक्षक दळवी याप्रकरणी तपास करीत आहेत.