देशात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढला

0
196

देशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होईल. काल दि. १७ रोजी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असून त्या संबंधी १७ मे रोजी माहिती दिली जाईल असे सांगितले होते.

त्यानुसार काल घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ४ संदर्भात नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहेत. तसेच महाविद्यालय, शाळा, चित्रपट गृहे, धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर ऍम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे.