कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी विषाणूचे संक्रमण सुरूच आहे. देशात गेल्या चोवीस तासांत पुन्हा ५० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ६९ नवीन बाधित सापडले असून १,१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात ५० हजार ८४८ कोरोनाबाधित आढळले होते.
दरम्यान, ६६ हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मागील २४ तासांत १६ हजार १३७ रुग्णांमध्ये घट झाली आहे. बुधवारी सुमारे १९ लाख जणांची चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.