भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव घटत असून गेल्या चोवीस तासांत नवे १६३ कोरोना रुग्ण आढळले. शनिवारी २१४ बाधित सापडले होते. त्यामुळे रुग्णसंख्येत चोवीस तासांत घट झाल्याचे दिसून आले. देशात सध्या ओमिक्रॉनच्या एक्सबीबी व्हेरियंटचे सात, बीएफ७ व्हेरियंटचे पाच आणि बीक्यू१.१ व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग घटत असला तरी धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केंद्रीय आरोग्य यंत्रणेने केले आहे. भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असले, तरी येथील परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे.